श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी – या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व सर्व प्राथमिक , माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे नियोजन इ. दहावी व इ.नववी च्या विद्यार्थ्यांनी केले .कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील इ. नववी अ च्या वर्गातील ज्ञानेश्वरी पवार, आटोळे सोनिया व तारीख बिराजदार, तृप्ती निटवेयांनी आपले शिक्षकांबद्दल चे विचार व्यक्त केले. जीवनातील गुरुचे स्थान सांगितले. तसेच सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनीने गाण्यातून आपली गुरु बद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री पवार बी.एन. सर यांनी प्राचीन काळापासून असलेले माणसाच्या जीवनातील गुरुचे महत्व सांगून सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. पवार बी.एन , ज्येष्ठ शिक्षक श्री तावरे जी.आर. सौ.सविता सातव, सौ.तृप्ती कांबळे, सौ.सुनिता कोकरे, श्रीम.रोहिणी टेके व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराज माने या विद्यार्थ्यांने केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. चौधर ए.आर. यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )