चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्या वतीने झाला गुणवंताचा सत्कार

चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्या वतीने झाला गुणवंताचा सत्कार

बारामती – चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. च्या माध्यमातून बारामतीमधील गांधी चौकातील दालनामध्ये सरडे गावचे सुपुत्र चि. वैभव बाजीराव धायगुडे यांची सर्वसाधारण वर्गातून 14 व एन टी सी मधून राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल तसेच श्रीमती. कोमल संभाजी सावरे यांची एमपीएससीच्या माध्यमातून मुख्याधिकारी म्हणून पाथरी जि. परभणी येथे निवड झालेबद्दल आणि चि. यश राजेंद्र गायकवाड (राहणार तरडगाव, फलटण )यांची u-19 नेपाळमध्ये होणाऱ्या कबड्डी स्पर्धेचे भारताचे कॅप्टन म्हणून निवड झाली आहे. त्यांचा सत्कार चंदूकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा-सराफ व सौ. नेहा शहा-सराफ यांच्या शुभहस्ते व उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी किशोर शहा यांनी सामाजिक बांधिलकी जपत निवड झालेल्या तिघांनाही शुभेच्छा देऊन आभार मानले. कार्यक्रमाला दीपक वाबळे यांचे मार्गदर्शन मिळाले. सूत्रसंचालन धनंजय माने यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )