बारामती लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांच्या आयोजनातून मतदान जनजागृती

बारामती लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांच्या आयोजनातून मतदान जनजागृती

बारामती, दि. २२: बारामती लोकसभा मतदारसंघात स्वीप उपक्रमाअंतर्गत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, याकरीता मतदान व मतदार जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मानवी साखळी, रांगोळी स्पर्धा, मतदान प्रतिज्ञा, प्रभातफेरी, भजन आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघात राधेश्याम एन अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट अँड कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदारांना मतदान जनजागृतीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदानाचा संदेश दिला. तसेच रांगोळी, घोषवाक्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात भवानीनगर येथील गोविंदराव पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालच्यावतीने प्रभातफेरीचे आयोजन करुन मतदारांची जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्याद्वारे नागरिकांना मतदान करण्याबाबत संदेश दिला. सरडेवाडी येथे वोटर हेल्पलाईन ॲपबाबत मतदारांना माहिती देण्यात आली.

भोर विधानसभा मतदारसंघात वेल्हे पंचायत समिती येथे तालुकास्तरीय मतदार जनजागृती मोहीमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. त्यांना मतदान जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले.

पानशेत येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने महिला मतदान जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. सोंडेमाथाना आणि पानशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पासली येथे रांगोळी स्पर्धा व मतदान प्रतिज्ञा वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोंढूर येथे भजनाच्या कार्यक्रमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

दौंड विधानसभा मतदारसंघात महिला मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत केडगाव बाजारपेठ येथे जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील दुकानदार, बँकेचे अधिकारी व कर्मचारी, भाजीविक्रेते आदींना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच मतदान करण्याबाबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील विविध आरोग्य केंद्रांवर मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदान व मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून याला नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )