लगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

लगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

आज समाजाला रोजगार देणाऱ्यांची गरज आहे, असा रोजगार देणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाला समाजापर्यंत नेण्याचे काम या विशेषांकाच्या माध्यमातून होत आहे.
ज्यांच्या घरात लग्नासारखे मोठे कार्य असते, त्यांना त्यावेळेस मदतीची गरज असते. लगिनघाई विशेषांकाच्या रुपाने त्यांची ही गरज पुर्ण होते आहे, असे कलाशिक्षक महेंद्र दिक्षित यांनी सांगितले. ते रागिणी बारामती मार्गदर्शिकेच्या लगिनघाई विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

रागिणी बारामती मार्गदर्शिकेच्या लगिनघाई विशेषांकाचे प्रकाशन ( दि.१८ ) मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रत्येक कुटुंबातील लग्न हा महत्वाचा सार्वजनिक कार्यक्रम असतो. या कार्यक्रमासाठी ज्योतिषी, पुरोहितांपासून लग्नासाठी लागणाऱ्या घोड्यापर्यंत ज्यांची गरज लागते त्या सर्व व्यवसायांची माहिती या पुस्तिकेत दिलेली आहे, यामुळे हा समाजोपयोगी उपक्रम असल्याचे मनोगत यावेळी शेखर कोठारी यांनी व्यक्त केले.

रागिणी बारामती मार्गदर्शिकेचा हा दुसरा अंक असून यानंतर महिला आणि शिक्षण या विषयावर सावित्री विशेषांक मार्च महिन्यात प्रकाशित करणार असल्याचे संपादक घनश्याम केळकर यांनी सांगितले.

रागिणी परिवाराच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी संस्थापक राजश्री आगम यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन ऋतुजा आगम, सुजाता लोंढे यांनी केले. चित्रकार फाल्गुनी देशपांडे, दैनिक बाळकडूचे संपादक दिपक खरात या कार्यक्रमास उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )