शाळा बंद करण्याचा निर्णयावर पुनर्विचार करा.

शाळा बंद करण्याचा निर्णयावर पुनर्विचार करा.

शाळा बंद नकोच.
विद्यार्थ्यांची व पालकांची मागणी
बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे ) कोरोना ची तीसरी लाट येणार असं एकंदरीत चित्र आहे. मोठ्या शहरी भागात कोरोना रुग्ण आढळत असल्याकारणाने शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. तो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा दृष्टीने घेतलेला आहे. पण आज ग्रामीण भागाची परिस्थिती पाहता ग्रामीण भागात कोरोना चा प्रादुर्भाव कमी आहे. नसल्यात जमा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील शाळा बंद करणे योग्य आहे का ? असा सवाल या वेळी पालकांनी उपस्थित केला.
आधिच दोन वर्षे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शाळेशी व शिक्षकांशी संपर्क तुटत आहे.
विद्यार्थ्यांचे मोठ्याप्रमाणात शैक्षणिक व मानसिक नुकसान होत आहे. एका घरी दोन विद्यार्थी असेल तर तेथे एकाच वेळी दोन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही. मध्यंतरी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले होते. आज कोरोना शहरी भागात वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण नाही अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे योग्य नाही. जेथे कोरोना रुग्ण नाही अशा ठिकाणी शाळा सुरू ठेवावी. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेवू द्यावा. अशी मागणी तहसीलदार तर्फे निवेदनातून शिक्षणमंत्री यांना विविध विद्यार्थी संघटने कडून करण्यात आली. या वेळी विद्यार्थी युवानेते पियुष रेवतकर ,अनिस मुल्ला सर, उमेशजी पाचपोहर, हरीभाऊ हिंगवे, उमाकांत धारपुरे , विद्यार्थी प्रतिनिधी विश्वभुषन पाटील , अक्षय भोणे,नितीन काशीकर, रोशन पठाडे, पवन रमधम व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )