जैनकवाडी व कटफळ येथे शेतीदिन व शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम संपन्न

जैनकवाडी व कटफळ येथे शेतीदिन व शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम संपन्न

माळेगाव ( प्रतिनिधी, गणेश तावरे) दिनांक 11/01/2022 रोजी मौजे जैनकवाडी व कटफळ येथे शेतीदिन व शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये शास्त्रज्ञ डॉ.भूषण गोसावी यांनी डाळिंबातील खोडकीड व मररोग तसेच कांदा व हरभरा व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. मंडल कृषी अधिकारी उंडवडी सुपे श्री. यमगर यांनी फोरोमन ट्रॅप, PMFME योजना MAHADBT योजना या विषयी मार्गदर्शन केले. हवामानावर आधारित फळ पीक विमा ‘पीक डाळिंब’ तसेच कृषि विभागाच्या विविध योजना विषयी माहीती कृषि सहायक सौ. मिरा राणे यांनी दिली. या कार्यक्रमाचे यु ट्यूब लाईव्ह व फेसबुक लाईव्ह संदिप मोरे यांनी केले. या कार्यक्रमास गावातील प्रगतीशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )