17 व्या वर्षी देखील त्याच उत्साहात शिवशंभो तरूण मंडळाने केली देवीची स्थापना

प्रतिनिधी – शिवशंभो तरूण मंडळ वाघवस्ती, या मंडळाची स्थापना 2004 साली झाली, या मंडळाला 17 वर्ष पूर्ण झाले, या मंडळाचा नियम आहे प्रत्येक देवीच्या ठिकाणाहून सलग 3 वर्ष ज्योत आणली जाते,1) राशीन जगदंबा देवी वरून ३ वेळा ज्योत आणली, 2) करमाळा कमला भवानी देवी वरून ३ वेळा ज्योत आणली, 3) पाथर्डी मोहटा देवी वरून ३ वेळा ज्योत आणली, 4) कुरकुंभ फिरंगाई देवी वरून ३ वेळा ज्योत आणली, 5) आष्टी येथील शृंगेरी देवी वरून ३ वेळा ज्योत आणली, असे मिळून 15 वर्ष व मागील वर्षी 2020 साली कोरोना च्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमाचे पालन करत मागील वर्षी या मंडळाने ज्योत आणली नाही व ते 16 वें वर्ष ,व या वर्षी म्हणजेच 17 व्या वर्षी भिगवन जवळील पिंपळे येथिल पद्मावती देवी मंदिर येथून ज्योत आणली व कर्जत चे प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत यांनी ज्योत आलेली समजताच सावता महाराज यांच्या मंदिराजवळ येवून ज्योतीचे फटाके फोडत स्वागत केले व मंडळा मधील तरुणांचे कौतुक केले व नवरात्री उत्सव च्या शुभेच्छा दिल्या.
पुढील 2 वर्ष पद्मावती देवी पिंपळे येथून ज्योत आणली जाणार आहे अशी माहिती अध्यक्ष पंकज वाघ व उपाध्यक्ष स्वप्निल भैय्या वाघ यांनी दिली…
9 दिवस वाघवस्ती येथिल सभा मंडप मध्ये देवी समोर आराधि मेळे भरवून गाण्या चे कार्यक्रम घेतले जातात… शिवशंभो तरूण मंडळ चे अध्यक्ष पंकज वाघ, उपाध्यक्ष स्वप्निल भैय्या वाघ, दादा वाघ, मंगेश वाघ, राजु येवले, कृष्णा क्षिरसागर, गोपाल वाघ, प्रशांत वाघ, दत्ता वाघ, अशोक वाघ, शिवा ढेंगळे, रमेश वाघ, विशाल वाघ, रोहित वाघ, स्वप्निल कोरडे, ऋषिकेश गोरे, दादा जाधव, रवी शेलार, हर्षल खंदारे, सुरज राऊत आदी तरूण सहभागी झाले होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )