लोणी भापकर येथे पीकविमा योजना प्रचार व प्रसिद्धी कॅम्प चे आयोजन

लोणी भापकर येथे पीकविमा योजना प्रचार व प्रसिद्धी कॅम्प चे आयोजन

प्रतिनिधी – लोणी भापकर येथे खरीप हंगाम पंतप्रधान पीक विमा योजना प्रचार व प्रसिद्धी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बाजरी, तुर, भुईमूग,कांदा, सोयाबीन इत्यादी पिकांचा विमा उतरवण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी बोराटे यांनी शेतकऱ्यांना केले. कृषी सहाय्यक तृप्ती गुंड यांनी विमा योजने बद्दल माहिती दिली. विमा हप्ता भरण्याची अंतिम दिनांक 31 जुलै आहे, त्यामुळे शेवटी गर्दी टाळण्यासाठी 28,29 तारखे प्रयंत विमा हप्ता भरावा असे सांगण्यात आले, तसेच विमा मिळावा यासाठी क्रॉप इन्शुरन्स मोबाईल aap डाऊनलोड करण्याविषयी माहिती दिली व अतिवृष्टी तसेच स्थानिक आपत्ती मुळे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत या aap वरून किंवा टोल फ्री क्रमांक वरून माहिती द्यावी असे विमा प्रतिनिधी पांडुरंग नलावडे यांनी सांगितले. या वेळी गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सायंबाच्या वाडी मध्ये देखील पत्रक वाटून खरीप हंगाम पंतप्रधान पीक विमा योजना विषयी कृषी सहाय्यक तृप्ती गुंड यांनी माहिती दिली. व अंतिम तारखे दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी येत्या दोन दिवसात च विमा हप्ता भरावा असे आवाहन यावेळी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )