योजनांच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्तींनी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करावे

<em>योजनांच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्तींनी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करावे</em>

पुणे दि.१८: शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थी तसेच व्यक्तींनी त्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शासनाच्या वित्त विभागाच्या ८ जून २०२२ च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतर (डिबीटी) पद्धतीने वर्ग करण्यात येणार आहेत. २०२२-२३ वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग तसेच मागासवर्गीय विद्यार्थी तसेच व्यक्तींनी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान, शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याणाच्या योजना, मागासवर्गीय कल्याणाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आधारकार्डाशी संलग्न करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरंगटीवार यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )