आता खूप झाली निवेदने… संभाजी ब्रिगेडने दिले आंदोलनाचे संकेत .

आता खूप झाली निवेदने… संभाजी ब्रिगेडने दिले आंदोलनाचे संकेत .

बारामती/(प्रतिनिधी गणेश तावरे)

शासन दरबारी धूळ खात पडलेला शहरातील आर्मी भर्ती साठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्यामार्फत पालकमंत्र्यांना कठोर स्मरण पत्र देऊन संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी कारंजा ने केली आहे .गेल्या कित्येक वर्षांपासून कारंजा शहरातील आर्मी भर्ती साठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना जागा नसल्यामुळे खूप मोठा त्रास होत आहे .वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील जी केदार यांनी आर्मी भर्ती साठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणार असं आश्वासन कारंजा मध्ये झालेल्या एका सभे मध्ये दिल होत मात्र ते अजूनही पूर्ण झालेलं नाही .गेल्या तीन वर्षांपासून सतत संभाजी ब्रिगेड द्वारे निवेदने देण्याच काम चालू आहे पण त्याला सरकार गांभीर्याने घेत नसून मागणी ला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही त्यामुळे जर या निवेदनातून आमची मन समाधानी नाही झाली तर आम्ही तहसील व नगरपंचायत समोर आंदोलनाला बसू असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून संभाजी ब्रिगेड ने दिला .संभाजी ब्रिगेड चे युवानेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलं .या वेळी संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर ,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुका प्रमुख वैभव चापले ,रोहित बननगरे ,दीप देवासे ,पवन गिरडकर ,व इतर संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )