डॉ.गौतम जाधव यांची रुद्रपूर उत्तराखंड येथे होणा-या १८ व्या ज्युनिअर नॅशनल व २२ व्या फेडरेशन कप कॉर्फबॉल चॅम्पियनशिप करिता चीफ कोच म्हणून नियुक्ती

डॉ.गौतम जाधव यांची रुद्रपूर उत्तराखंड येथे होणा-या १८ व्या ज्युनिअर नॅशनल व २२ व्या फेडरेशन कप कॉर्फबॉल चॅम्पियनशिप करिता चीफ कोच म्हणून नियुक्ती

प्रतिनिधी – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डॉ.गौतम जाधव, संचालक शारीरिक शिक्षण यांची महाराष्ट्र कॉर्फबॉल असोसिएशन यांच्यातर्फे दि. २४ मार्च ते २७ मे २०२३ या कालावधीत रुद्रपूर उत्तराखंड येथे होणा-या १८ व्या ज्युनिअर नॅशनल व २२ व्या फेडरेशन कप कॉर्फबॉल चॅम्पियनशिप करिता महाराष्ट्राचे चीफ कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.गौतम जाधव हे गेल्या १५ वर्षांपासून या महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट शारीरिक शिक्षण संचालक’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे पर्ल फाउंडेशन, मदुराई यांचा ‘उत्कृष्ट शारीरिक शिक्षण संचालक’ पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कॉर्फबॉल, बेसबॉल स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले आहे.महाविद्यालयामध्ये होणा-या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या विविध पदांवर ते सदस्य म्हणून काम करीत आहेत. राष्ट्रीय आंतररराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, संस्थेचे सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, रजिस्ट्रार, सर्व उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )