युवा संसद २०२१-२२ मध्ये टी सी कॉलेजचे घवघवीत यश

 एम आय टी येथे झालेल्या युवक बिरादरी अभिरूप युवा संसदेत टी सी कॉलेजचा तृतीय क्रमांक 

नुकत्याच पुणे येथे एम आय टी कॉलेज मध्ये पार पडलेल्या अभिरूप युवा संसद या स्पर्धेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला असून ही स्पर्धा युवक बिरादरी यांच्या मार्फत घेण्यात आली होती.या स्पर्धेत बारामती,पुणे,सातारा,मुंबई,पनवेल या भागातून हे संघ आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.रवी चिटणीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महारा्ट्रातील सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी RJ संग्राम यांनी हजेरी लावली होती.
बक्षीस वितरणाच्या वेळी तुळजराम चतुरचंद महाविद्यालयातील ऋतिका शिंदे हिला उत्कृष्ठ संसदपटू हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. स्पर्धेत मुख्य तीन क्रमांक देण्यात आले .प्रथम क्रमांकाला एम आय टी कॉलेजने गवसणी घातली तर द्वितीय क्रमांक एस पी कॉलेज ला प्राप्त झाला आणि तृतीय क्रमांक तूळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने पटकावला.यासाठी महाविद्यालयाचा संघ बनवण्यासाठी , प्रा.भीमराव तोरणे,डॉ.विलास कर्डिले आणि राजा पांडे यांनी मार्गदर्शन केलं.
संघ नायक म्हणून ए बी पाटील, प्रितम गुळूमकर,प्रज्वल वारे फजल पठाण,मेघना जाधव ,निलेश जाधव यांनी संघामध्ये मोलाची भूमिका बजावली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर,उपप्राचार्य डॉ.अविनाश जगताप आणि रजिस्टार अभिनंदन शहा यांनी विजेत्या संघाचे आभिनंदन केलं

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )