जिवनज्योत बहुउद्देशीय सेवा संस्थातर्फे गरजू कुटुंबाना तिरंगा झेंड्याचे वाटप

जिवनज्योत बहुउद्देशीय सेवा संस्थातर्फे गरजू कुटुंबाना तिरंगा झेंड्याचे वाटप

बारामती : (प्रतिनिधी. रियाज पठाण ) संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे. हा उपक्रम १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तीन दिवस करावे असे सांगण्यात आले आहे.
त्या निम्मित समाजसेवा या भावनेतून बारामती तालुक्यातील मुढाळे या गावी पारधी समाजातील गरजू कुटुंबाना जिवनज्योत बहुउद्देशीय सेवा संस्था यांनी भारत देशाचा तिरंगा झेंड्याचे मोफत वाटप केले.
यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश संजय महाडिक, सचिव चेतन गालिंदे, व अभय गालिंदे यावेळी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )