टेक्निकल विद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड

टेक्निकल विद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड

प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत इ 5 वी व इ 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बारामतीच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती च्या 10 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.यामध्ये इ 5 वी च्या 4 विद्यार्थ्यांची तर इ 8 वी च्या 6 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे .यामध्ये इ 5 वी साठी वणवे प्रथमेश लक्ष्मण, कु.दळवे संस्कृती नितीन,थोरात ओम राहुल,बागवान सफान रौफ तर इ 8 वी च्या प्रणव नवनाथ निकम,प्रजेश सुनील नेहरे, प्रज्वल किरण भोसले,कु.सिद्धी महेंद्र खराडे,कु.सिद्धी हेमराज पानसरे ,आदित्य दत्तात्रय बनकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.या सर्व विद्यार्थांचे, विभागप्रमुख घुले के.डी व निकम ए .एन तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सदाशिव (बापूजी) सातव ,विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,व पर्यवेक्षक श्री निवास सणस यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )