बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक 8 वसंतनगर येथे इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न…

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक 8 वसंतनगर येथे इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 22/04/2022 रोजी बा न प शाळा क्रमांक 8 वसंतनगर येथे इयत्ता सातवी तील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी डॉ आशिष जळक- श्री चैतन्य टेस्ट बेबी बारामती, संदीप आहेर- युवा उद्योजक बारामती, सौ.टीना रोहित सराफ – ज्वेलरी डिझायनर, श्री.जनकराजजी सोनवणे अधीक्षक होमगार्ड बारामती, श्री.माणिकराव गायकवाड -सामाजिक कार्यकर्ते वसंतनगर हे सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बापू नरुटे यांनी केले तसेच आहेर यांनी मुलांना भविष्यातील उद्योगाच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले. सौ.टीना रोहित सराफ यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय ठरवून आपण कसे त्या पर्यंत पोहोचले पाहिजे व कॉम्प्युटर सायन्सबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. सोनवणे व श्री माणिकराव गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले. शाळेबद्दल मनोगत श्री विलास कंकाळ यांनी केले. तसेच इयत्ता सातवीतील मंगेश पाचगणे व साजिया साह या विद्यार्थ्यांनी भाषण केले. शाळेचे मुख्याध्यापक सौ निर्मला शेंडे,श्री निळकंठ कापसे यांनीही मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ शुभदा कुलकर्णी व पुनम कांबळे यांनी व अंगणवाडी ताई सौ.गजाकस मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच इयत्ता सातवीच्या सौ वर्षा मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )