ट्राफिक पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर ; 14 वाहनांवर कारवाई करून 16,500 रु दंड

ट्राफिक पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर ; 14 वाहनांवर कारवाई करून 16,500 रु दंड

प्रतिनिधी – सतत घडणाऱ्या अपघातांमुळे बारामती मधील वाहतूक यंत्रणा तसेच अवैध डंपर, टिपर, ट्रकची वाहतूक हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात शहरात अपघातांमुळे मृत्यू झाले आहेत. या घटनेवर विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना, यांनी आक्रमक आवाज उठवला आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती शहरात येणारे अवजड वाहनांचे विशेष मोहीम राबवून पाटस रोड व फलटण रोड या ठिकाणी नाकाबंदी करून अवजड वाहतूक तसेच डंपर चालक यांचे कागदपत्र, लायसन्स याची तपासणी केली गेली. तसेच डंपर वर असणारे अंधुक नंबर या संबंधीची दंडात्मक कारवाई केली व सदरचे नंबर दिसतील अशा प्रकारे साफ करून घेतले घेतले. 14 वाहनांवर कारवाई करून 16500 दंड करण्यात आला आहे. सदरची मोहीम यापुढे देखील सुरू ठेवत आहोत. असे बालाजी भांगे स.पो.नि. जिल्हा वाहतूक शाखा, बारामती शहर यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )