कृषि विभागातर्फे पीक स्पर्धेचे आयोजन

कृषि विभागातर्फे पीक स्पर्धेचे आयोजन

बारामती दि. 26 :- कृषि विभागामार्फत खरीप हंगामात सोयाबीन, बाजरी, मका या पीकांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणेसाठी प्रती शेतकरी रूपये 300/- इतके शुल्क आहे.

सोयाबीन, बाजरी, मका या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रयोग करून उत्पादकतेत वाढ होण्यासाठी व प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढविण्यासाठी या पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे शुल्क तालुका कृषि अधिकारी , बारामती यांचे कार्यालयात येवून चलनाव्दारे जमा करावयाची आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास रू.5000/-, व्दितीय क्रमांकास रू. 3000/- व तृतीय क्रमांकास रू.2000/- असे बक्षिस देवून गौरव करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे, आवाहन तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )