विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या तिमाही सभेचे १३ सप्टेंबरला आयोजन

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या तिमाही सभेचे १३ सप्टेंबरला आयोजन

पुणे दि.२६:- विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची तिमाही सभा दि.१३ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित केली असल्याचे पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा उपायुक्त (महसूल) यांनी कळविले आहे.
शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्र. अहत १६१०/प्र.क्र.६४/१०/११-अ, दिनांक ४ फेब्रुवारी, २०११ मधील परिच्छेद क्र. ६ (ब) अन्वये प्रत्येक तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजीत केली जाते. तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनांबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. ही बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरचे पुढील महिन्याच्या दुस-या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येते. तदनंतर करोना / कोव्हीड-१९ या साथीच्या रोगाच्या सार्वजनिक प्रादुर्भावामुळे बैठक आयोजित करता आली नाही. पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सप्टेबर, २०२१ या महिन्याच्या दुस-या सोमवारी दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी ११.३० वाजता सभागृह क्र. १ विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित केली जाणार आहे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )