कृषि विभागाकडून शिर्सुफळ येथील शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती

कृषि विभागाकडून शिर्सुफळ येथील शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती

प्रतिनिधी – दिनांक 22 मे रोजी मौजे शिर्सुफळ ता. बारामती येथे खरीप हंगाम 2023 अंतर्गत घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासणी, बियाणे बीजप्रक्रिया, हुमणी कीड नियंत्रण, प्रकाश सापळे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, एमआरईजीएस अंतर्गत फळबाग लागवड , प्रधानमंत्री कृषि सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना, १ रुपया भरून प्रधानमंत्री पिक विमा योजना, इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली यावेळी श्री.अप्पासाहेब आटोळे सरपंच, श्री. राजेंद्र आटोळे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला शेतकरी व इतर शेतकरी उपस्थित होते. यानंतर शिर्सूफळ येथील महादेव तानाजी आटोळे यांच्या शेतावर हुमनी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा देखील लावण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )