सुपे येथे वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सर्प जनजागृती कार्यक्रम

प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , रविवार दिनांक 03 ऑक्टोबर 2021

आज दिनांक..३ ऑक्टोंबर २०२१ रोजी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वन्यजीव मयुरेश्वर अभयारण्य सुपे याठिकाणी निसर्ग स्पर्श फाउंडेशन सुपे व वन्यजीव मयुरेश्वर अभयारण्य यांच्या संयुक्ताने सर्प जनजागृती हा कार्यक्रम मयुरेश्वर अभयारण्य या ठिकाणी घेण्यात आला

या…कार्यक्रमाला पुणे या ठिकाणाहून काही शाळा देखील उपस्थित होते.. फ्लेक्स बॅनर च्या माध्यमातून मुलांना प्रत्यक्षात सर्प दाखवण्यात आले.. सर्प हा निसर्गातील अतिशय महत्त्वाचा घटक असून त्याचे तुम्ही संरक्षण करावे असेदेखील मुले व त्या ठिकाणी असणाऱ्या शिक्षकांना देखील मार्गदर्शन करण्यात आले..

या वेळेस या कार्यक्रमाला उपस्थित वन्यजीव मयुरेश्वर अभयारण्य सुपे . वनाधिकारी , वनकर्मचारी तसेच निसर्ग स्पर्श फाऊंडेशन.सुपे , सर्पमित्र टिम विलास वाघचौरे , सोनु लोंढे , अतुल ढम , रोहित खळदे उपस्थित होते .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )