पानगल्ली येथील नागरिकांच्या आंदोलनाला यश…

पानगल्ली येथील नागरिकांच्या आंदोलनाला यश…

प्रतिनिधी – बारामती शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील पानगल्ली येथील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली आहे. सदर ठिकाणी नवीन शौचालय बांधून मिळावे या मागणीसाठी बारामती नगर परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणतीही दखल घेतली नाही. तसेच अस्वच्छ सार्वजनिक शौचालयात पडल्यामुळे दोन नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या तीन व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी म्हणून दिनांक ०१/०९/२०२३ रोजी बारामती नगरपरिषद समोर समस्त पानगल्ली येथील रहिवासी, होलार समाज यंग ब्रिगेड संघटना,भारतीय युवा पँथर संघटना यांनी संयुक्त बेमुदत धरणे आंदोलन केले होते. यावेळी बारामती येथील सामाजिक संघटना,वंचित बहुजन आघाडी, बारामती संपादक पत्रकार संघ यांनी जाहीर पाठिंबा दिला. स्थानिक नागरिक व होलार समाज यंग ब्रिगेड महाराष्ट्र राज्य,भारतीय युवा पँथर संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी विशाल जाधव युवक शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी चर्चा केली.मागण्या समजावून घेऊन मुख्याधिकारी यांना भेटून सदर आंदोलन बाबत जाधव यांनी चर्चा केली.
बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सदर शौचालयाची डागडुजी करून देतो आणि शासकीय जागेवर नवीन सार्वजनिक शौचालय बांधून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )