स्व.सै.स्व.डुमन चौधरी स्मृतिप्रीत्यर्थ नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न

स्व.सै.स्व.डुमन चौधरी स्मृतिप्रीत्यर्थ नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न

चोपडा,प्रतिनिधी – श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा, प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने थोर स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय डुमन मंगा चौधरी यांचे तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादनाचा व नेत्रचिकित्सा शिबिर असा कार्यक्रम श्रीराम नगर चोपडा येथे संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर चोपडा येथे पार पडला. प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के डी चौधरी, चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष टी एम चौधरीसर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवकांत के चौधरी, महिला उपाध्यक्ष योगिता शशिकांत चौधरी, नारायण चौधरी, सरलाबाई चौधरी, प्रकाश चौधरी, नेरकर ज्ञानेश्वर, आदींनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. गौरव प्रदीप चौधरी यांनी चाळीस लोकांची नेत्र चिकित्सा करून मार्गदर्शन केले. ऑपरेशनसाठी निवड केलेल्यांनावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळेस डॉ. गौरव चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )