वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा… बारामती प्रांत कार्यालयावर कडाडला.

वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा… बारामती प्रांत कार्यालयावर कडाडला.

प्रतिनिधी – मणिपूरमध्ये मध्ये घडलेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्व तर्फे बारामती प्रांत कार्यालयावरती निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष राज कुमार म्हणाले अस्वस्थ मणिपूर आहे कि अस्वस्थ भारत आहे? मणिपूर धगधगतंय कि संपूर्ण भारत धगधगतोय? मणिपूर हादरलय कि संपूर्ण भारतीय समाजच हादरला आहे? विटंबना दोन स्त्रियांची झाली कि भारतातील संपूर्ण स्त्री जातीची झाली? विवस्त्र धिंड दोन स्त्रियांची निघाली, कि हजारो वर्षांचा इतिहास असणा-या भारतीय संस्कृतीची निघाली?


मणिपूर सारख्या सीमेवरील अतिसंवेदनशील राज्यात गेली अडीच ते तीन महिने दोन जातीमध्ये प्रचंड जीवघेणा संघर्ष सुरु आहे. स्त्रियांच्या विटंबनेमुळे अगोदरच संवेदनशील असणारे भारतीय समाजमन पूर्णतः हादरुन गेलं आहे. त्यामुळं ही दोन स्त्रियांची विटंबना नसून जगासमोर भारताला नग्न करून भारताची इज्जत काढली अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी असे मत राज कुमार यांनी व्यक्त केले. भारतासारख्या देशांमध्ये स्त्रियांवरती अत्याचार केला जातो याच्यासारखी निंदनीय गोष्ट कोणतीच नसून मणिपूर घटनेची दखल घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागावी असे मत महिला जिल्हा अध्यक्षा सीमाताई भालेसाईन यांनी व्यक्त केले, मणिपूर येथे तीन महिन्यापासून संघर्ष चालू असून महिलांची नग्न धिंड काढून देखील प्रशासनाने केसेस केल्या नाहीत त्यामुळे तेथील पोलीस प्रशासनाला देखील जबाबदार धरून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत असे मत महासचिव मंगलदास निकाळजे यांनी व्यक्त केले यांच्या बरोबरच महासचिव प्रियांकाताई लोंढे, उपाध्यक्ष मलतीताई बेडेकर, प्रशांतीताई साळवे, महासचिव निलेश वामणे, उपाध्यक्ष सतीश साळवे, सल्लागार बाळासाहेब मोरे, सचिव जावेद मोमीन, माढा युवक अध्यक्ष साहेबराव वाघमारे, माढा माजी अध्यक्ष गोपाळ घाडगे, दीपक झोडगे,दौंड तालुका अध्यक्ष आश्विन वाघमारे, शिरूर तालुका महासचिव अनिल कांबळे, खेड तालुका अध्यक्ष महेंद्र नाईकनवरे, बारामती तालुका अध्यक्ष रामदास जगताप, जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, बारामती शहर अध्यक्ष रियाज खान, सचिन जगताप, वर्षाताई जगताप यांनी मत मांडून मणिपूर घटनेचा निषेध व्यक्त केला. सूत्रसंचालन वैभव कांबळे यांनी केले, आभार इंदापूर तालुका अध्यक्ष मनोज साबळे यांनी मानले. यावेळी जिल्हा संघटक साईनाथ लोंढे, सुजय रणदिवे, धीरज कांबळे, गोविंद कांबळे, शिरूर तालुका अध्यक्ष जितेंद्र जगताप, माळशिरस तालुका अध्यक्ष अभिमान गायकवाड, पंढरपुर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप, इंदापूर तालुका महासचिव गौतम कांबळे, प्रसिद्धी प्रमुख राहुल कांबळे, इंदापूर शहर अध्यक्ष सुभाष खरे, महासचिव किर्तिकुमार वाघमारे, उपाध्यक्ष रमजान सय्यद, उपाध्यक्ष सिद्धार्थ पारर्धे, सचिव संजय धिमधिमे, संघटक सागर खरतोडे, हिरामण जाधव, दत्ता कांबळे, विजय साळवे, सनी बाबर, विजय जगताप, विशाल अवघडे, लखन अवघडे, अर्जुन अवघडे, करण भोसले, सोनू अवघडे, ऋत्विक सावंत, सोमनाथ गायकवाड, माढा जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप, विकास कांबळे,माढा जिल्हा युवक महासचिव नितीन सरवदे, माळशिरस महासचिव रोहित नवगिरे, अकलूज शहर अध्यक्ष सुनील कांबळे, नातेपुते शहर अध्यक्ष धर्मा सावंत, किरण झेंडे, शंकर कांबळे, साईमाऊली खुडे, अरविंद खरात, सनी सावंत, समीर नलावडे, सोनू काळे, सनी सावंत, वैभव सावंत, सुरज झेंडे, अक्षय माने, राम सोरटे, प्रकाश दणाने, प्रकाश भागवत, भाऊराव भागवत, मनोज देवकर,श्रीकांत सावंत, रमेश साळवे, दर्शन सुरवसे, आकाश जगताप, सुनील कांबळे, शंकर पाटील, कुंडलिक कांबळे, सूनका जाधव, विनोद जगताप, राहुल आबनावे, पप्पू जगताप, प्रमोद कदम, संदीप जगताप, अंबुदास आबनावे, प्रथमेश कदम, बारामती तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव, संघटक मंगेश सोनवणे, सम्यक तालुका अध्यक्ष रोहित भोसले, सहसचिव सागर जगताप, काकासाहेब सोनवणे, मिनाथ कर्गे, आदित्य सोनवणे, स्वप्नील कांबळे, विनायक जाधव, दादासो खंडाळे, उपाध्यक्ष सुनिल वाघमारे, बारामती शहर मधून विनय दामोदरे, सूरज घावळे, परिक्षीत चव्हाण, चेतन साबळे, जितेंद्र जगताप, प्रशांत लांडे, राजेश पडकर, कृष्णा सोनवणे, महेश बालगूडे, विशाल बालगूडे, विशाल घोडके, महादेव मिसळ, मनोज मिसाळ, शुभम पालेकर, रोहित पाचकुडवे, मुकुंद सोनवणे, अमोल शिंदे, निलेश भोसले, इम्रान बागवान, सुनिता जगताप, मोहिनी जगताप, विश्रांती जगताप, अशपाक बागवान, इरफान बागवान, अकील बागवान, अमोल वाटकर, बबलू सविता सहाणे , शाकूबाई लोंढे , राजश्री सोनवणे , बादशाह शेख , महबूब शेख , मुस्तफा पटेल , वाहिद शेख , कमल जगताप , रेखा बालगुडे, बबलू शेख गफूर भाई सय्यद राजू चव्हाण, दीपक धेंडे, समीर तांबोळी, देवराज कांबळे, माळेगाव शहर अध्यक्ष अण्णा घोडके, रमेश शिंदे, शंकर राणे, प्रशांत ढोबळे, जीवक सरवदे, सचिन जाधव, अशोक वावरे, अनिल शिंदे, प्रतीक शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )