श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी…

श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी…

प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त माननीय प्राचार्य बी.एन.पवार साहेब उपमुख्याध्यापक पी .एन. तरंगे पर्यवेक्षक बी.ए. सुतार तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनींनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रतिज्ञा सौ. प्रियंका कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली. तसेच श्रीराज माने या विद्यार्थ्याने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची संस्कृत मधील कविता विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केली या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल श्री.सतीश वाघ व श्री. तानाजी धायगुडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. रमेश गोळे यांनी केले

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )