73 व्या प्रजासत्ताकदिनी देऊळगाव रसाळ येथे एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन च्या वतीने 73 रक्तदात्यांचे योगदान

<em>73 व्या प्रजासत्ताकदिनी देऊळगाव रसाळ येथे एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन च्या वतीने 73 रक्तदात्यांचे योगदान</em>

प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , बारामती

बुधवार दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी 73 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त देऊळगाव रसाळ ता. बारामती या ठिकाणी एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते.

इंदापूर येथील मुक्ताई ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन च्या वतीने 73 रक्तदात्यांनी योगदान दिले. सह्याद्री फोटो स्टुडिओ , देऊळगाव रसाळ या ठिकाणी हा कार्यक्रम कोविड -19 चे सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आला. रक्तदान शिबिराचे दुसरे वर्ष होते. रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तु देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर पोहे , चहा , बिस्कीट , केळी व चक्कु आयोजकांच्या वतीने वाटप करण्यात आले.

त्यावेळी भैरवनाथ तरुण मंडळ , वाबळे पाटील युवा प्रतिष्ठाण , नवजवान तरुण मंडळ , शिवतेज तरुण मंडळ , शिवशंभो तरुण मंडळ , जय हनुमान तरुण मंडळ , जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठाण , गणेशनगर तरुण मंडळ आदी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी योगदान दिले.

एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. आय्याज इनामदार , जावेद इनामदार , शाहरुख इनामदार , अरीफ इनामदार , बडेखान इनामदार , फारुख इनामदार , गणेश रसाळ , नागेश रसाळ , अमित रसाळ , शेखर खंडागळे , संग्राम वाबळे , ईश्वर वाबळे , अभिजित राऊत , भैया बागल , आदी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य झाले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )