टेक्निकल विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा

टेक्निकल विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या ठिकाणी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या वेळी इ 9 वी ब च्या विद्यार्थांनी वाचनाचे महत्व विषद केले. वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून विद्यार्थांनी सुविचार व सुभाषिते सांगितली. तसेच यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तर ग्रंथालय विभागामार्फत वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. तसेच जागतिक हात धुवा दिन हात धुण्याच्या योग्य पद्धती सांगून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री सणस,आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे, जेष्ठ शिक्षक सोमनाथ मिड, सुनील चांदगुडे, मोहन ओमासे, शशिकांत फडतरे, महादेव शेलार, जयवंतराव मांडके, संजय निगडे, सौ.जयश्री हिवरकर, अर्चना पेटकर,व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.उर्मिला भोसले यांनी केले, सूत्रसंचालन कु.समृद्धी कुमठेकर हिने केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )