मानव सुरक्षा सेवा संघ, भारती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणीचे आयोजन..!

मानव सुरक्षा सेवा संघ, भारती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणीचे आयोजन..!

बारामती -आज बारामतीमध्ये मानव सुरक्षा सेवा, भारती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या आजारांवरती विशेष तपासणीचे आयाेजन करण्यात आले हाेते. सर्व रोग निदान शिबिरामध्ये नेत्र तपासणी, अस्थी तपासणी, रक्त तपासणी अशा आजारांवर गरीब व गरजू लोकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मानव सुरक्षा संघाची ध्येयधोरणं एकच आहेत की अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देणे व त्याला वाचा फोडणे. या कार्यक्रमावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित सौ रेणूताई येळगांवकर महिला प्रदेशाध्यक्षा यांनी देखील आपले मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे हे देखील या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की मानव सुरक्षा संघ भारत या संघटनेमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने प्रवेश करून समाज कार्य करावे या कार्यक्रमाचे आयोजन मानव सुरक्षा संघाचे कैलास शिंदे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र तसेच चक्रपाणी चाचर पुणे कार्याध्यक्ष व तालुकाध्यक्ष गणेश शिंदे तसेच तालुकाप्रमुख चेतन शिंदे गजानन गायकवाड यांच्यासह सर्वच पदाधिकार्यांनी केली. भाऊसाहेब मांढरे यांच्या स्मरणार्थ स्नेह भोजनाचा आस्वाद उपस्थित मान्यवर व शिबिरात येणार्या नागरिकांना देण्यात आला. या कार्यक्रमाला बारामतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर व नगरसेवक तसेच माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ , नगरसेवक गणेश भाईजी सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला. मानव सुरक्षा सेवा सेवासंघाचे तालुक्यांमधून आलेले सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )