“अशुभ” कार्याचा काढला “शुभ” मुहूर्त…..परंतु पोलिसांसमोर निघालं सगळंच “व्यर्थ”….

“अशुभ” कार्याचा काढला “शुभ” मुहूर्त…..परंतु पोलिसांसमोर निघालं सगळंच “व्यर्थ”….

कोटींचा दरोडा टाकणारे जेरबंद…

प्रतिनिधी – बारामती तालुका पोलीस स्टेशनचे हद्दीतील देवकाते नगर येथे सागर शिवाजी गोफणे हा त्याची पत्नी सौ तृप्ती सागर गोफणे असे दोन मुलांसह राहत आहेत. दि २१/०४/२०२३ रोजी सागर गोफणे हा तिरूपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेला होता. रात्री ०८:०० च्या तृप्ती सागर गोफणे या त्यांच्या लहान मुलासह घरी असताना चार अनोळखी चोरटयांनी घराचे कंपाउंड भिंतीवरून आत प्रवेश केला. तृप्ती गोफणे हिला मारहाण करून तिचे हातपाय बांधले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम ९५ लाख ३० हजार रूपये रोख रक्कम व सुमारे २० तोळे वजनाचे ११ लाख ५९ हजार ३०० रूपये किंचे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल असा एकूण १ कोटी ७ लाख २४ हजार ३०० रूपये किंमतीचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. त्याबाबत सौ तृप्ती सागर गोफणे रा. देवकाते नगर बारामती ता बारामती जि पुणे यांनी बारामती तालुका पो स्टे गुरनं २२४ / २०२३ भा.दं.वि.का.क. ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


बारामती शहरात लोक वस्तीत रहदारीचे वेळी घटना घडल्याने परीसरात व बारामती शहरात खळबळ उडाली व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्हयाची व्याप्ती व गांर्भीय मोठे होते. घटनेचा प्रकार पाहता, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री सुनिल फुलारी साो. कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी तातडीने तसेच वेळोवेळी मार्गदर्शन व सुचना केल्या. मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल साो. पुणे ग्रामीण यांनी गुन्हयाचे स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथके नेमून गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही, गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेवून गुन्हा उघडकीस आणणेकामी काही योजना तयार करून मार्गदर्शन केले आणि दर आठवड्याला सदर गुन्ह्याचे बाबत मागोवा घेतला. गुन्हा करणारे आरोपींनी आपण पकडले जावू नये याकरीता सर्वोतोपरी काळजी घेवून कोणताही मागमूस ठेवला नव्हता. नेमलेल्या तपास पथकाने सीसीटीव्ही चे प्राप्त फुटेज मधील आरोपींचे वर्णन, पेहराव असे बारकावे तपासून गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर गुन्हयाची उकल केली आणि गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

           गुन्हयातील आरोपी हे एमआयडीसीतील मजुर कामगार असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संशयित आरोपींचे हालचालींवर बारकाईने लक्ष केंद्रीत करून खात्री झाल्याने आरोपी नामे १) सचिन अशोक जगधने, वय ३० वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. गुणवडी, २९ फाटा, जि.प.शाळेजवळ, ता. बारामती, जि पुणे २) रायबा तानाजी चव्हाण, वय ३२ वर्षे, व्यवसाय चालक, रा. शेटफळ हवेली, जाधववस्ती, कॅनॉलजवळ, ता. इंदापूर, जि. पुणे ३) रविंद्र शिवाजी भोसले, वय २७ वर्षे, व्यवसाय नोकरी /शेतमजुरी, रा. निरा वागज, घाडगेवाडी रोड, भोसलेवस्ती, पाण्याचे टाकीजवळ, ता. बारामती, जि. पुणे, ४) दुर्योधन ऊर्फ दिपक ऊर्फ पप्पु धनाजी जाधव, वय ३५ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. जिंती, हायस्कुलचे जवळ ता. फलटण, जि. सातारा, ५) नितीन अर्जुन मोरे, वय ३६ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. धर्मपुरी, ता. माळशीरस, जि सोलापूर, यांना स्थानिक गुन्हे

शाखेच्या वेगवेगळया पथकाने बारामती तालुका परीसर, मेखळी, अशा वेगवेगळ्या परीसरातून ताब्यात घेवून चौकशी केली. असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सागर गोफणे हा जमीन खरेदी विक्री व्यवसाय असून त्याचेजवळ भरपूर पैसे असलेबाबत माहिती आरोपी नामे सचिन जगधने यास मिळाली होती, त्याने गुन्हयाचा कट रचला तसेच सदरचा गुन्हा करणे पुर्वी आरोपींनी आरोपी नामे ६) रामचंद्र वामन चव्हाण वय ४३ वर्षे, व्यवसाय शेती, ज्योतीष, मुळ रा. आंदरूड ता. फलटण जि सातारा सध्या रा. वडुज, पेडगाव रोड, प्रतिक ढाब्या जवळ, गुरुकृपा अपार्टमेंट, दुसरा मजला, ता. खटाव जि सातारा या ज्योतीष शास्त्र पाहणारे आरोपीस कटात सामील करून घेवून त्याचेकडून गुन्हा करणेसाठी मुहूर्त काढून त्याचे मार्गदर्शनाखाली गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या आरोपीस देखील अटक केली. गुन्हयास कट रचून दरोडा टाकल्याची कलमे वाढविली आहेत.

    आरोपींकडून पंचनाम्याने अदयाप पर्यंत एकूण ७६ लाख ३२ हजार ४९० रूपये किं चा मुद्देमाल हस्तगत करन्यात आला असून त्यामध्ये ६० लाख ९७ हजार रुपये रोख रक्कम व १५ लाख ३५ हजार ४१० रूपये किंमतीचे २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करणेत आलेले आहेत. आरोपी हे बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात असून दि

२५/०८/२०२३ रोजी पर्यंत मिळाली आहे. सदरची कामगिरी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी साो., मा पोलीस अधीक्षक श्री अंकित
गोयल सो पुणे ग्रामीण, मा अपर पोलीस अधीक्षक श्री आनंद भोईटे सो बारामती विभाग, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मा. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि नेताजी गंधारे, राहुल गावडे, पोसई अभिजीत सावंत, प्रदीप चौधरी, शिवाजी ननवरे, अमित सिदपाटील, गणेश जगदाळे, सफौ रविराज कोकरे, बाळसाहेब कारंडे, पोहवा सचिन घाडगे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, अजित भुजबळ, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, दिपकसाबळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, अजय घुले, महादेव बाबर, पोना निलेश शिंदे, तुषार भोईटे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, संदिप वारे, पोकॉ धिरज जाधव, अक्षय नवले, मंगेश भगत, चासफौ मुकुंद कदम, प्रमोद नवले, चापोकॉ दगडू विरकर, अक्षय सुपे यांनी केली असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोनि प्रभाकर मोरे, पोसई राजेश माळी, पोशि दिपक दराडे हे करत आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )