विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती दि. 10 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

श्री.पवार यांनी आज बारामती येथील कऱ्हा नदी सुशोभिकरण प्रकल्पातंर्गत नदीतील कामांची, दशक्रिया विधी घाट, परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभिकरण इत्यादी कामांची कामाची पाहणी केली. यावेळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगरराध्यक्ष अभिजित जाधव, गटनेता सचिन सातव, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सर्व विभागांनी विकास कामे दर्जेदार करण्याचे निर्देश दिले. परकाळे बंगला येथील कॅनलच्या भिंतीशेजारी लावण्यात येणारी झाडे एका रेषेत आणि समान अंतरावर लावावी. विकासकामांसाठी विभागाने प्रस्ताव सादर करताना सार्वजनिक कामे चांगली व वेळेत होतील याचेही नियोजन करावे. असे त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यकारी अभियंता अनिल ढेपे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, उपअभियंता राहूल पवार आदी उपस्थित होते.

बारामती नगरपरिषद आणि एनवायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया बारामती शाखेच्या संयुक्त विद्यमाने बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत वृक्षारोपण अभियान राबवून 7 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचा सुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जनहित प्रतिष्ठान ज्ञान प्रबोधनी हायस्कूल, गुजर इस्टेट आणि परकाळे बंगला येथील कॅनलवर वृक्षलागवड करुन करण्यात आला. यावेळी सुजित जाधव मित्रपरिवार तांदुळवाडी यांच्या तर्फे मोहगणीची शंभर रोपे नगरपरिषदेस मोफत देण्यात आली.

यावेळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, नगपरिषदेचे सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )