नागरीकांचे हरविलेले 1 लाख 12 हजारांचे एकुण 06 मोबाईल माळेगाव पोलीस ठाणे कडुन परत..

नागरीकांचे हरविलेले 1 लाख 12 हजारांचे एकुण 06 मोबाईल माळेगाव पोलीस ठाणे कडुन परत..

माळेगाव – (प्रतिनिधी गणेश तावरे) पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु / मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तकारींचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणेसंदर्भात मा. श्री. अंकित गोयल सोो. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे सुचना व मार्गदर्शनाचे अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल मधील माळेगाव ठाणे हददीतुन नागरीकांचे हरविलेले मोबाईल बाबत माळेगाव पोलीस स्टेशन प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण यांचे कडील सायबर पोलीस ठाणे यांचेकडे पोलीस नाईक श्री ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन प्राप्त माहीतीचे तांत्रिक विश्लेषण केलेनंतर खालील नागरीक अ.क. 1 ते 6 यांचे एकुण 1,12,000 /- रु अंकी (अक्षरी एक लाख बारा हजार रु. जु.वा. किं. अं.) चे एकुण 06 मोबाईलचा महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणांहुन शोध
घेवुन माळेगाव पोलीस स्टेशन येथे प्राप्त करुन आज दिनांक 10/10/2023 रोजी पोलीस निरीक्षक श्री. किरण अवचर सो. यांचे हस्ते मुळ तक्रारदार यांना परत दिलेले आहेत. 1) श्री.दिलीपकुमार दादासो घुले रा. खताळपटा ढेकळवाडी ता.बारामती जि.पुणे 2) श्री. तुषार भगवान कोकरे रा. म्हसोबानगर मानाप्पावस्ती ता. बारामती जि. पुणे, 3) श्री.अजय शिवाजी विरकर रा. कोरेगाव ता. कोरेगाव जि.सातारा, 4) श्री.सचिन तुकाराम कोरपड रा. पणदरे ता. बारामती जि.पुणे, 5) श्री. प्रविण लक्ष्मण टाक रा. माळेगाव बु।। ता. बारामती जि. पुणे, 6) श्री. सुशांत कृष्णाथ तारळेकर रा. माळेगाव बु।। ता. बारामती जि. पुणे सदरची कामगिरी ही मा.श्री. अंकित गोयल सो. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री.आनंद भोईटे सो.. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, श्री. गणेश इंगळे सोा. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग,
श्री.प्रविण खानापुरे, सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, श्री. किरण अवचर, पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यांनी केलेली असुन सदर कामी सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांचेकडील पोलीस नाईक श्री. महेश कोळी यांनी सहकार्य केलेले आहे. नागरीकांचे हरविलेले किंमती मोबाईल हे माळेगाव पोलीस स्टेशन कडुन शोध घेवुन मुळ मालकांना परत मिळाल्याने मोबाईल मालक यांनी समाधान व्यक्त करुन माळेगाव पोलीसांचे आभार मानलेले आहेत. माळेगाव पोलीस स्टेशन कडुन माहे मे 2023 ते आज पावेतो एकुण 3 लाख 25 हजार रुपये किंमतीचे नागरीकांचे हरविलेले एकुण 26 मोबाईल शोधुन परत दिलेले आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )