मा कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाननिमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे उदघाटन मा.ना दत्तात्रय(मामा)भरणे यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी- रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभाग औंध पुणे व साधना शैक्षणिक संकुल हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते पद्मविभूषण खासदार शरदरावजी पवारसाहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिम्मित शरद रयत चषक राज्यस्तरीय शालेय माध्यमिक स्तर(इ 8 वी ते 10 वी) ऑनलाईन निबंध स्पर्धेचे उदघाटन आज बारामती येथील जिजाऊ भवन या ठिकाणी मा.नामदार दत्तात्रय भरणे(राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन खाते महाराष्ट्र राज्य)यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात रयत गीताने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.डॉ.अनिल पाटील होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय चेअरमन मा.आमदार राम कांडगे यांनी केले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात पवार साहेबांचे असलेले योगदान त्यांनी नमूद करत या निबंध स्पर्धेची गरज स्पष्ट केली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.ना दत्तात्रय(मामा)भरणे यांनी श्री शरद पवार साहेब यांच्या राज्याच्या जडणघडणीत असलेले योगदान नमूद केले. या स्पर्धेच्या नियमावलीचे वाचन श्री महेंद्र जोशी यांनी केले. तर अध्यक्षीय भाषणात मा.डॉ अनिल पाटील यांनी 21 व्या शतकातील रयत शिक्षण संस्थेची चाललेली वाटचाल व यामध्ये शरद पवार साहेबांचे असलेले योगदान नमूद केले.प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीचे सदस्य मा.सदाशिव (बापू) सातव, बारामतीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, स्कूल कमिटी सदस्य श्री दिलीपराव ढवाण पाटील, विभागीय अधिकारी श्री किसन रत्नपारखी , सहाय्यक विभागीय अधिकारी मा.एस टी. पवार.समन्वय समिती सदस्य श्री बंडू पवार, श्री विष्णू बाबर, आर.एन.आगरवाल टेक बारामतीचे प्राचार्य मा.झेड जी शेख, साधना विद्यालयाचे प्रा.विजय शितोळे,चं. बा. तुपे कन्या विद्यालय हडपसर च्या प्राचार्या मा.सुजाता कालेकर , शिक्षक सदस्य श्री गणपतराव तावरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार श्री किसन रत्नपारखी यांनी तर सूत्रसंचालन श्री विकास जाधव व सौ उर्मिला भोसले यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )