जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत बारामतीची स्वप्नाली मदने प्रथम

प्रतिनिधी : दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ , बारामती
शुक्रवार दिनांक 17 डिसेंम्बर 2021 नेहरू युवा केंद्र पुणे युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पूना कॉलेज पुणे या ठिकाणी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र निर्माण या विषयावर जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेमध्ये बारामतीच्या मुलींनी बाजी मारली. देशभक्ती व राष्ट्र निर्माण या विषयावर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या वतीने पुणे येथील पूना कॉलेज या ठिकाणी जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांचे तालुकास्तरीय मध्ये नंबर आले होते असे पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन स्पर्धक सहभागी झाले होते, स्पर्धेचे परीक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली चव्हाण व प्रा.डॉ.शाखिर शेख यांनी काम पाहीले .

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथील स्वप्नाली मदने तर द्वितीय क्रमांक शर्मिला देवकाते यांनी पटकावला तसेच तृतीय क्रमांक जुन्नर येथील कुमार चव्हाण यांना मिळाला.

तसेच स्वपनाली मदने यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली.

ही स्पर्धा नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. याप्रसंगी बारामती तालुका प्रतिनिधी वैभव भापकर, कविता जाधव उपस्थित होते यावेळी कार्यालयीन प्रतिनिधी स्वप्नील शिंदे यांनी सुत्रसंचलन केले तर आभार धीरज वायाळ या कार्यक्रम दरम्यान होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )