भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती २०२२ ची
कार्यकारणी जाहीर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती २०२२ ची<br />कार्यकारणी जाहीर

बारामती (प्रतिनिधी. रियाज पठाण.) दि.10: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने दि.०६ मार्च रोजी समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गेल्या वर्षीच्या जयंती महोत्सव समितीच्या कार्यकारीणीने अहवाल सादर करत समिती बरखास्त करून सन २०२२ साठी नवीन समितीची कार्यकारणी जाहीर केली. त्यामध्ये मंगलदास निकाळजे, दयावान दामोदरे, आकाश दामोदरे, अनिकेत मोहिते, संतोष जगताप, सिध्दार्थ सोनवणे, संजय वाघमारे, अभिजीत कांबळे, चेतन साबळे, विश्वास लोंढे, परिक्षीत चव्हाण, उत्तम धोत्रे, यांची एकमताने अधीकृत निवड करण्यात आली. तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक कांबळे यांनी या बैठकीचे अध्यक्ष स्थान भुषविले.
दरम्यान कोरोनामुळे गेले २ वर्षा जयंती साजरी करता आली नसल्याने हया वर्षी मोठया उत्साहाने जयंती साजरी करणेचे ठरवले. तसेच दरवर्षी प्रमाणे दि.१४ एप्रिल रोजी निघणारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा बारामती शहरातुन मोठया उत्साहाने काढण्याचे जाहीर करण्यात आले. असे या नवनिर्वाचित समितीच्या सदस्यांनी सांगितले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )