अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ बारामती शहर अध्यक्षपदी महेश गायकवाड यांची निवड…

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ बारामती शहर अध्यक्षपदी महेश गायकवाड यांची निवड…

प्रतिनिधी – काल बारामती क्लब येथे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चर्चासत्र व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा लक्ष्मण हाके व अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा अध्यक्ष व बारामतीचे माजी नगरसेवक अभिजित काळे यांनी केले व स्वागत भारत भोंग व ज्ञानदेव खामगळ यांनी केले आभार सचिन शाहीर यांनी मानले. यावेळी संघटनेचे प्रमुख 50 नविन पदाधिकार्याच्या नियुक्तीपत्र देण्यात आली .
यावेळी बारामती शहर अध्यक्ष पदी महेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर महेश गायकवाड यांनी सांगितले की संघटनेच्या माध्यमातून सर्व obc समाज एकत्र करून संघटना वाढीसाठी काम करणार आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )