कऱ्हावागज येथे आत्माअंतर्गत शेतकरी शेतीशाळा संपन्न

कऱ्हावागज येथे आत्माअंतर्गत शेतकरी शेतीशाळा संपन्न

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यातर्फे आत्मा अंतर्गत कांदा पिक शेतकरी शेतीशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये शेतकर्याना कांदा लागवडीपासुन ते साठवणी पर्यतचे संपुर्ण मार्गदर्शन करण्यात आले. कांदा पिक प्रात्यक्षिक व कार्यक्रमाचे आयोजन श्री मच्छीद्रनाथ जगन्नाथ मुलमुले प्रगतीशील शेतकरी यांचे शेतात करण्यात आले.
कांदा पिक लागवड याविषयी श्री गणेश जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक श्री संतोष पिसे यांनी केले. कर्हावागज गावचे शेतकरी व कृषी सहाय्यक श्रीमती ज्योती आडके यांचे संपुर्ण सहकार्य या कार्यक्रमासाठी मिळाले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )