बारामतीच्या कराटे खेळाडूंचे कराटे स्पर्धेत यश

<em>बारामतीच्या कराटे खेळाडूंचे कराटे स्पर्धेत यश</em>

बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे) : – 6 मार्च 2022 रोजी सांगली येथे झालेल्या 5 व्या खुल्या कराटे चॅम्पियनशिप 2022 मध्ये बारामतीच्या चॅम्पियन्स स्पोर्ट्स फौंडेशन च्या 7 मुलांनी भाग घेऊन 7 गोल्ड व 7 कांस्य मिळऊन यश संपादन केले. त्यामध्ये अमोश बिके 2 सुवर्ण , पार्थ शेटे 2 सुवर्ण , ओमराज धायगुडे 1सुवर्ण , 1रौप्य , आर्यन पवार 1सुवर्ण ,1रौप्य , अर्जुन वीर 1सुवर्ण , 1रौप्य , आदित्य साळुंखे 2रौप्य , आर्यन श्रीरसागर 2रौप्य अशी ऐकून 14 पदके पटकावून बारामतीचे नाव उंचावले आहे. या विद्यार्थ्यांना सेन्सेई अनुराग देशमुख ( संस्थापक चॅम्पियन्स स्पोर्ट्स फौंडेशन) यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह 6 राज्यातील कराटे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत सेन्सई अनुराग देशमुख यांना सर्वोत्तम पंच हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बारामतीचे चॅम्पियन्स स्पोर्ट्स फौंडेशन चे विद्यार्थी वेळेवेळी बारामतीचे नाव उंचावत राहतात व असेच उंचावत राहतील अनुराग म्हणाले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )