सुपा येथे शिवशक्ती चषकाचे आयोजन…

सुपा येथे शिवशक्ती चषकाचे आयोजन…

सुपे: सुपे (ता.बारामती) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवशक्ती चषक भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विद्याप्रतिष्ठान चे खजिनदार युगेंद्र दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या दरम्यान बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती पोपट पानसरे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तात्रय कुतवळ, संपत जगताप, अनिल हिरवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शोकतभाई कोतवाल आणि मोठ्या प्रमाणावर सुपा परगणा भागातील युवा वर्ग उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )