गोरेगाव (वांगी) ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

गोरेगाव (वांगी) ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

बारामती (प्रतिनिधी, गणेश तावरे)- मौजे गोरेगाव(वांगी) ता.खटाव या गावातील पाणीपुरवठा पाईपलाईन गेले दीड वर्ष झाले चार ते पाच ठिकाणी लिकीज आहे. लिकीज काढण्यासाठी मा.सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार लेखी अर्ज करण्यात आले आहेत तरी देखील त्यावर कार्यवाही झालेली नाही त्यामुळे गावातील नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाला विचारले असता टोलवा-टोलवीची उत्तरे ग्रामस्थांना मिळत आहेत गावातील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे तरी देखील ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे तरी इथून पुढे होणाऱ्या नुकसानीस ग्रामपंचायत जबाबदार राहणार का?? वरील सर्व माहिती RPS प्रेस रिपोर्टर असोसिएशन खटाव तालुका अध्यक्ष पत्रकार सौरभ चव्हाण यांनी दिली आहे ते म्हणाले की प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आम्ही आंदोलन करू.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )