कारंजा येथील ए .आर .सी पब्लिक स्कूल मध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा.

कारंजा येथील ए .आर .सी पब्लिक स्कूल मध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा.

बारामती /प्रतिनिधी – गणेश तावरे
कारंजा शहरातील ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली .काल दिनांक 12 जानेवारी रोज बुधवार ला स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात आला .जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान राबविण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे राज्य शासनाने दिले आहेत या उपक्रमाअंतर्गत ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे हा उपक्रम योग्य पद्धतीने राबविण्यात आला .शाळेच्या उपमुख्याध्यापिका सारिका सातपूरे यांनी विद्यार्थ्यांना जिजाऊ यांच्या जयंती निमित्य व राष्ट्रीय युवा दिना बद्दल मार्गदर्शन केले .जिजाऊ यांच्या इतिहासाला वाचून व प्रेरणा घेऊन मुलींनी मजबूत वाहायला पाहिजे असं मत शाळेच्या इतिहास विषयाच्या शिक्षिका सारिका नासरे यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाच प्रास्ताविक शाळेच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका स्नेहा मानवर , तर आभारप्रदर्शन किसन मात्रे यांनी केलं . या जयंती निमित्य शाळेतील इत्या 10 वी चे विद्यार्थी धीरज बन यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित माहीत सांगितली . या वेळी कार्यक्रमाला शाळेच्या उपमुख्याध्यापिका सारिका सातपूरे ,सारिका नासरे ,स्नेहा मानवर ,किसन मात्रे ,उमेश साठवणे ,अमोल केळझलकर ,ललित मस्के ,नेहा चौधरी ,सरोज मॅडम ,बुशरा पठाण शाळेतील शिक्षक शिक्षिका व शाळेतील संपूर्ण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )