कारंजा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

कारंजा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

बारामती, प्रतिनिधी – गणेश तावरे – कारंजा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली . स्वराज्य संकल्पक मासाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद काल यांची जयंती .स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या जयंती निमित्त रक्त संकलन समिती कारंजा घाडगे द्वारा रक्तदान शिबिर च आयोजन करण्यात आले होते .कारंजा येथील गुरुदेव सेवा मंडळ येथे जयंती व रक्तदान शिबिर च आयोजन करण्यात आले होते .सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले .त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली . 61 नागरिकांनी शिबिरात रक्तदान केले व त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले .या वेळी उपस्थित मॉडेल हायस्कूल चे माजी मुख्यधापक विलासराव वानखेडे ,स्वामी विवेकानंद रक्त संकलन समिती चे हेमंत बननगरे ,संभाजी ब्रिगेड चे माजी तालुका उपाध्यक्ष उमेश पाचपोहर ,माजी ग्रामपंचायत सदस्य कमलेश कठाने ,प्रेस व पत्रकार संघाचे कारंजा तालुका अध्यक्ष पियुष रेवतकर ,पवन ठाकरे ,रोशन ढोबाळे ,मंगेश भगत आदी पाहुणे उपस्थित होते .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )