बंदमध्ये “सहभागी” परंतु व्यवसायिकांची “नाराजी”

बंदमध्ये “सहभागी” परंतु व्यवसायिकांची “नाराजी”

प्रतिनिधी :- आज संपूर्ण महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या बंदला कुठे चांगला प्रतिसाद तर कुठे संमिश्र प्रतिसाद मिळाला. बारामती मधील मुख्य चौकांमध्ये दुकाने बंद होती तर मुख्य चौक वगळता इतर परिसरातील दुकाने, व्यवसाय सुरूच आहेत. या दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला असता अशी माहिती मिळाली कि शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा सर्व व्यवसायिकांनी निषेध केला आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत नेहमीच आहोत. परंतु व्यवसाय बंद ठेवणे हा मार्ग योग्य नाही. कोरोना मुळे आधीच व्यवसाय डबघाईला आले आहेत. अनेक व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, यातून कसेतरी व्यावसायिक-व्यापारी सावरत सावरत उभारी घेत आहेत. त्यात एक दिवस जरी व्यवसाय बंद राहिला तर दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम होतो. माल खरेदी करून ठेवणे, कामगारांची सोय करणे या गोष्टी पुन्हा नव्याने सुरू कराव्या लागतात. त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी या बंद बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अनेकांच्या मते हा बंद राजकीय असून शेतकऱ्यांचा खोटा कळवळा दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधीच ऑनलाइन शॉपिंग मुळे व्यवसायिकांची-व्यापाऱ्यांची वाताहत झाली आहे. अधिकचा डिस्काउंट मिळत असल्याने ग्राहक ऑनलाइन शॉपिंगकडे वळला आहे. त्यात रोजचा ग्राहक कमी होत चालला आहे आणि अशात व्यवसाय बंद ठेवणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया बोलून दाखवल्या आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )