पावसाळ्यातील बेडकांप्रमाणे उगवणाऱ्या विरोधकांच्या जीवावर परिवर्तन होऊ शकत नाही – अँड.अमोल सातकर

पावसाळ्यातील बेडकांप्रमाणे उगवणाऱ्या विरोधकांच्या जीवावर परिवर्तन होऊ शकत नाही – अँड.अमोल सातकर

प्रतिनिधी – काल परवा बारामती शहर आणी परिसरात भारतीय जनता पार्टी चे नेते मा. चंद्रशेखर बावनकुळे व आमदार गोपीचंद पडळकर यांचा दौरा झाला, त्या दरम्यान बारामती मधे परिवर्तन करण्याची गरज आहे व होऊ शकते आशी नेत्यानी वक्तव्य केली,
परंतु परिवर्तन केव्हा घढेल जेव्हा इथला संपुर्ण विरोधक एकवटला जाईल ताकदीने काम करेल तेव्हा, पंरतु काल ही बाहेरची नेते मंडळी आल्यावरती जी इथली काही नेते मंडळी स्टेज वरती होती जी पावसाळ्यातल्या बेडका प्रमाणे बाहेर येतात, कोणी मोठा नेता बाहेरून आला किंवा निवडणूक आली की आम्ही विरोधात आहोत हे दाखवन्या साठी बाहेर पडतात,आणी इतर वेळेस पक्ष जिवंत ठेवने ,आंदोलन करणे, पक्षाचे विवीध उपक्रम राबवणे,हे सगळे कार्यकर्ते व इतर मंडळी करीत आसतात,त्या मुळे या पावसाळी बेडकांच्या जीवावर बारामतीत परिवर्तन घडवायचा पर्यन्त करणार आसाला तर तो यशस्वी होणार नाही, कारण यातली काही मंडळी ठरावीक संस्था, आश्या मर्यादित विरोधक आहेत, यातली काही मंडळी, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत इथल्या सत्ता धारकांना गोवींद बागेत जाऊन भेटत आसतात,कारण 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मा.महादेवराव जानकर साहेब व 2019 विधानसभा निवडणुकीत मा.गोपीचंद पडळकर उभा होते इथल्या कोणत्या कोणत्या विरोधकांनी काय काय काम केले याचा हिसाब किताब सगळा आहे त्यामुळे या पावसाळ्यात बेडकांच्या जीवावर इथे परिवर्तन होणे कठीण आहे,आसे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष अँड.अमोल सातकर यांनी व्यक्त केले,

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )