निर्यातक्षम भाजीपाला पिकाची लागवड
विषयावर सांगवी येथे शेतीशाळा संपन्न

<em>निर्यातक्षम भाजीपाला पिकाची लागवड</em><br /><em>विषयावर सांगवी येथे शेतीशाळा संपन्न</em>

बारामती दि. १६ : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे, नाथसन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत निर्यातक्षम भाजीपाला पिकाची लागवड व शेतकरी शेतीशाळा आज सांगवी येथे संपन्न झाली.

कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, के.बी.एक्सपोर्ट फलटणचे निर्यात तज्ञ अधिकारी सुधीर चौगुले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गणेश जाधव, कृषि सहाय्यक ऋषिकेश कदम, नाथसन कंपनीचे चेअरमन नितीन तावरे, शेतकरी आदी उपस्थित होते.

या शेतीशाळेत श्री. चौगुले यांनी भाजीपाला पिकाची लागवड, भाजीपाला व भेंडी निर्यात करताना घ्यावयाची काळजी, खतांचा संतुलित वापर व उर्वरित रासायनिक अंश तपासणी-मानांकन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतीमालावर प्रक्रिया करण्याने मूल्यवर्धन होऊन शेतमालाच्या बाजार भावात वाढ होते आणि शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक फायदा मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ यांनी केले. आभार कंपनीचे चेअरमन नितीन तावरे यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )