जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षकांना केले सन्मानित

<em>जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षकांना केले सन्मानित</em>

प्रतिनिधी – देऊळगाव रसाळ येथे जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठान देऊळगाव रसाळ व चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा देऊळगाव रसाळ येथील वसंतराव पवार विद्यालय देऊळगाव रसाळ या ठीकाणी आयोजीत करण्यात आला होता.

त्यावेळी पालक शिक्षक व विद्यार्थी धागा मजबुत व्हायला हवा , भाषणांमधून व घोषणामधून दिसणारी समता वास्तवात आणणे हेच शिक्षकांपुढे खरे आव्हान आहे , शाळा मोबाईल मुक्त झाल्या तर शिक्षकाच्या स्वप्नातील विद्यार्थी घडू शकतो , शिक्षक पालक व विद्यार्थी यांचा संवाद असेल तर शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागते , शिक्षकांची अवांतर कामं कमी व्हावीत व शालेय वेळात शिक्षक पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसोबत राहावा यासाठी आता पर्याय शोधण्याची वेळ आली आहे असे मत कवी हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले.

त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी श्री. हनुमंत चांदगुडे , प्रमुख पाहुणे श्री लक्ष्मीकांत मुळे मंडल अधिकारी सुपे , चंदूकाका सराफ येथील ब्रँच मॅनेजर श्री. रोहित अवघे , मार्केटींग मॅनेजर श्री. धनंजय माने , सौ. शालिनी माकर शिक्षण विस्तार अधिकारी , श्री. हनुमंत चव्हाण केंद्र प्रमुख देऊळगाव रसाळ , सौ. वैशाली वाबळे सरपंच , श्री. दत्तात्रय वाबळे उपसरपंच , ह भ प संजय महाराज वाबळे कार्याध्यक्ष जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठान , प्रतापराव वाबळे , शिवाजी रसाळ , दिपक नाना वाबळे , गौरी वाबळे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी चंदूकाका सराफ येथील मॅनेजर दिपक माणिकराव वाबळे , मुख्यध्यापक विलास तावरे, सतीश काकडे , वर्षा गाडेकर व विषय तज्ञ वैशाली रसाळ यांनी सहकार्य केले.

त्यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देऊळगाव रसाळ , केंद्रातील सर्व शिक्षक , शिक्षिका व वसंतराव पवार विद्यालय देऊळगाव रसाळ विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षिका व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यावेळी मार्गदर्शन ह भ प संजय महाराज वाबळे , उपसरपंच दत्तात्रय वाबळे , विजय साळुंके , दिपक खोमणे , उमेश वाबळे , दिपाली साळुंके यांनी केले , सूत्रसंचालन बापुराव कांबळे सर व आभार दिपक नाना वाबळे यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )