प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

<em>प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन</em>

बारामती, दि. २: प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत विविध प्रकल्प उभारण्याबाबत कृषि विभागाच्यावतीने ३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता बारामती सहकारी दूध संघाच्या शरद सभागृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, सहकारी दुध संघ, कृषि उत्पन्न बाजार समिती, स्वयं सहाय्यता गट, फेडरेशन व आत्मा अंतर्गत शेतकरी गट यांना ३ कोटी रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते. या कार्यशाळेत योजनेचा उद्देश, सामाईक पायाभूत सुविधा, मुल्य साखळी, प्रकल्पासाठी लागणारे कागदपत्रे व अनुदानाचे स्वरूप इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेस खासदार सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेस बारामती उपविभागातील सर्व शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, स्वयंसहाय्यता गट, फेडरेशनचे प्रतिनिधी, आत्मा अंतर्गत गटांचे गट प्रमुख यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )