नामदार मा. छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजन थाळी केंद्रावर पुरणपोळी चे वाटप

नामदार मा. छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजन थाळी केंद्रावर पुरणपोळी चे वाटप

प्रतिनिधी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त बारामती येथील श्री गणेश भाजी मंडई शिवभोजन केंद्रावरती पुरनपोळी चे जेवन वाटप करण्यात आले. यावेळी केंद्राचे संचालक श्री प्रदिप (सोनुशेठ) दादा लोणकर , निलेश मोरे, नितिन अंधारे, दादा जोगदंड, फारूक बागवान, शाहबाज बागवान, प्रमोद बनकर, नितीन चालक , योगेश सस्ते, सागर कदम , अजीज बागवान व इतर मंडई मधील विक्रेते उपस्थित होते. यावेळी शिवभोजन गरजू व्यक्तींना पुरण पोळी वाटप करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना दिसून आली व त्यांनी पुरणपोळीचा मनमुराद आस्वाद घेऊन छगन भुजबळ यांना आशीर्वाद दिले व आयोजकांचे कौतुक केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )