धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन : अमराई मधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन : अमराई मधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी – दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी माजी नगरसेविका व राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे अध्यक्ष आरती गव्हाळे (शेंडगे ) यांच्या माध्यमातून बारामती मधील अमराई विभागात घेण्यात आलेल्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महिलांसाठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमास अमराई मधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये प्रमुख आकर्षण सुर नवा ध्यास नवा फेम गायिका राधाताई खुडे या उपस्थित होत्या. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने गायिका राधा खुडे यांचा सत्कार करण्यात आला. महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन महिला डॉक्टर रुपनवर यांनी केले. तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मंगलताई बोरावके यांनी उखाण्यांच्या माध्यमातून अमराई मधील महिलांचा उत्साह वाढवला. सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिलेल्या महिलांसाठी राजेंद्र भंडारे यांनी फळवाटप केली. या प्रसंगी बारामती नगरीच्या नगराध्यक्षा सौ पौर्णिमा तावरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले व आरती गव्हाळे-शेंडगे यांनी महिलांसाठी घेतलेल्या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका सई सातव, माजी नगरसेवक सुभाष ढोले, महिला बारामती तालुका अध्यक्ष वनिता बनकर, महिला बारामती शहराध्यक्ष अनिता गायकवाड, नगरसेविका निता चव्हाण, माजी नगरसेविका सुनीता देवरे, बारामती भगिनी मंडळ अध्यक्षा राणी जगताप, भगिनी मंडळ माजी अध्यक्षा सुनिता शहा, सौ संगीता काकडे, दिपाली पवार, रोहिणी आटोळे, सुप्रिया बर्गे, शितल कोठारी, पत्रकार तैनुर शेख, संदीप साबळे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रमणी नगर हाऊसिंग सोसायटी मधील महिलांचा समावेश होता.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )