कृषी अधिकाऱ्यांची माळेगाव येथील खजूर शेतीस भेट

कृषी अधिकाऱ्यांची माळेगाव येथील खजूर शेतीस भेट

प्रतिनिधी- दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी माळेगाव खुर्द येथील शेतकरी प्रशांत प्रतापराव काटे, यांच्या खजूर शेतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला विनयकुमार आवटे मुख्य सांख्यिक कृषि आयुक्तालय पुणे 1 यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी खजूर पिकातील विविध बारकावे जाणून घेतले व त्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी खजूर प्लॉटमध्ये अंतर पीक म्हणून घेतलेले पेरू आणि औषधी लिंबाची पाहणी केली. यावेळी सुप्रिया बांदल तालुका कृषि अधिकारी, बारामती. चंद्रकांत मासाळ मंडळ कृषि अधिकारी, बारामती. नेमाजी गोलांडे कृषि पर्यवेक्षक, बारामती. कोमल भानवसे कृषि सहायक माळेगाव हे उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )