कोळोली या ठिकाणी मोफत डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत बियाणे वाटप

प्रतिनीधी : दिपक वाबळे
शनिवार , दिनांक 02 ऑक्टोबर 2021

आज कोळोली येथे 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात मंडल अधिकारी श्री. मुळे भाऊसाहेब , तलाठी धापटे मॅडम , सरपंच सौ. पल्लवी खेत्रे , ग्रामसेवक हिरवे मॅडम , कृषी साहाय्यक गुंड मॅडम यांच्या उपस्थितीत ७/१२ वाटप करण्यात आले .

तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौ. तृ. रब्बी ज्वारी चे बियाणे वाटपाचा कार्यक्रम पार पडला .

त्यावेळी उपस्थित उपसरपंच सतीश काकडे , ग्रा प सदस्य राहुल गोसावी , विजय कांबळे , पोलोस पाटील विजय खेत्रे , संतोष काटे , राहुल काटे , देवा खेत्रे , अभिजित काकडे , अरुण खेत्रे , अंकुश देवडे , बाळासाहेब खेत्रे , प्रमोद खेत्रे , जालिंदर काकडे , प्रशांत काटे , रामचंद्र जाधव , राजेंद्र गायकवाड , अभिजित खेत्रे , अतुल खेत्रे , रवींद्र बारवकर , रामदास सकट , सुशील सकट आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )