एकात्मिक द्राक्ष व्यवस्थापन चर्चासत्र व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

<em>एकात्मिक द्राक्ष व्यवस्थापन चर्चासत्र व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन</em>

बारामती दि.५ : कृषि विभाग महाराष्ट्र शासन व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांचे संयुक्त विद्यमाने एकात्मिक द्राक्ष व्यवस्थापन चर्चासत्र व शेतकरी प्रशिक्षणाचे ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता राधिका रेसिडेन्सी क्लब इंदापूर येथे आयोजन केले आहे.

या चर्चासत्रामध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सोमकुंवर, डॉ. उपाध्याय, डॉ. रामटेके, डॉ. सुजय सहा आदी संशोधक द्राक्ष कॅनॉपी, अन्नद्रव्ये, रोग व कीड व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन करणार असून डॉ. संतोष चव्हाण हे जैविक कीड व रोग नियंत्रण यावर मार्गदर्शन करणार आहेत.

बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड तालुक्यातील इच्छुक  शेतक-यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )